On-Page-SEO म्हणजे काय ?

ब्लॉगिंग मधला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे SEO. साधारणतः SEO चे दोन प्रकार आहेत त्यातला एक म्हणजे हा On-Page SEO. या लेखमध्ये आपण पाहणार आहोत कि On-Page SEO म्हणजे काय? आणि On-Page SEO कसे करावे? जर तुम्हाला SEO म्हणजे काय? हा लेख वाचायचा असेल तर तुम्ही येथे क्लिक करून पाहू शकता. तर चला वेळ न लावता पाहुयात कि On-Page SEO म्हणजे काय?

On-Page SEO म्हणजे काय?

     On-Page SEO हा आपल्या ब्लॉगच्या डिजाइन वर निर्धारित असतो. यामुळे ब्लॉगवर भेट देणाऱ्यांची संख्या वाढायला मदत होते. ब्लॉग आकर्षक व सुंदर दिसतो. ब्लॉगसाठी चांगली आकर्षक आणि पटकन लोड होणारी थीम वापरणे, ब्लॉगची लोडींग स्पीड कमी ठेवणे, सुंदर आकर्षक आणि SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट्स लिहणे, image optimization, keyword optimization, हे सर्व घटक या प्रकारात येतात.

On-Page SEO कसे करावे?

१) टायटल टॅग- Title Tag

     टायटल टॅग म्हणजे ब्लॉगचे किंवा ब्लॉग पेजचे शीर्षक. हा जो ब्लॉग तुम्ही वाचत आहात त्याचे शीर्षक आहे "मराठी माहिती ". टायटल टॅग हा एका कीवर्डसारखे काम करतो परंतु हा कीवर्ड नाही हे आहे तुमच्या ब्लॉगचे शीर्षक. जर कोणी गुगल वर मराठी माहिती सर्च केले तर त्यांना हा ब्लॉग दिसेल. ब्लॉगचे टायटल देताना  लक्षात ठेवा कि गुगल सर्च इंजिन हे सर्वसाधारणतः ५० अक्षरापर्यंत टायटल दर्शवतो त्यामुळे टायटल टाकताना ५० अक्षरापर्यंत टाकावे. 


२) मेटा डिस्क्रिपशन- Meta Description

     मेटा डिस्क्रिपशन हे ब्लॉगबद्दल थोडक्यात माहिती असते. मेटा डिस्क्रिपशनचा परिणाम SEO वर सुद्धा पडतो. जर तुम्ही गुगलवर "मराठी माहिती" सर्च केले तर तुम्हाला हा ब्लॉग दिसेल आणि ब्लॉगच्या खाली काही लिहिलेले असेल ते आहे या ब्लॉगचे मेटा डिस्क्रिपशन. मेटा डिस्क्रिपशन हे कीवर्डसारखे कामसुद्धा करते. मेटा डिस्क्रिपशन हे १५० अक्षरांचे असते. ब्लॉगर मध्ये मेटा डिस्क्रिपशन कसे लिहावे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


३) SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट-

     ब्लॉगिंग मधला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा. ब्लॉगची रँकिंग हि लिहलेल्या पोस्टवर बऱ्याच अर्थाने निर्धारित असते. SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्टवर ब्लॉगची ९०% रँकिंग निर्धारित असते. खालील घटकांचा उत्तमरित्या वापर ब्लॉग पोस्टला SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट बनवतात.

  • पोस्टचे शीर्षक 
  • Headings (H1-H6)  
  • उत्तम दर्जाची माहिती - Quality Content
  • सर्च डिस्क्रिपशन 
  • Permalink 
  • Labels

४) Image Optimization-

      Image Optimization हे ब्लॉगच्या लॉंडींग स्पीड वर खूप परिणाम करते. ब्लॉग पोस्टमध्ये इमेज टाकताना आधी साइज बघत जा. इमेज साइज जास्त असल्याने वेबसाईट स्पीड कमी होते त्यामुळे इमेज साइज १००kb च्या जवळ ठेवणे चांगले ठरते. त्याबरोबरच ब्लॉग पेजनुसार इमेज चांगली दिसणे सुद्धा महत्वाचे आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो या पेजवर जी सर्वात पाहिली इमेज आहे तिची साइज ६६३*३९८ पिक्सेल अशी आहे. 


५) वेबसाईट स्पीड- Website Speed

     ब्लॉगची रँकिंग वाढवायला वेबसाईट स्पीड हा महत्वाचा भाग असतो. ब्लॉगची लोडींग स्पीड कमीत कमी असली पाहिजे जेणेकरून तुमच्या ब्लॉगवर येणाऱ्यांना जास्त वेळ वाट पाहावा नाही लागली पाहिजे. असे नाही कि लोडींग स्पीडचा प्रभाव फक्त ब्लॉगच्या व्हिजिटर वर पडतो, याचा प्रभाव डायरेक्ट ब्लॉगच्या रँकिंगवर पडतो. गुगल हे व्यक्तीच्या कीवर्डनुसार चांगली माहिती शोधत असते आणि त्यात जास्त लोडींग स्पीड असलेल्या ब्लॉगला मागे ठेवले जाते. अश्या कारणांमुळे SEO साठी वेबसाईट स्पीड अत्यंत महत्वाची ठरते.


६) आकर्षक थीम-

      वरील सर्व घटकांबरोबरच एक चांगली आकर्षक आणि पटकन लोड होणारी ब्लॉग थीम सुद्धा On-Page SEO साठी खूप महत्वाची आहे. ब्लॉग दिसायला चांगला असल्यावर व्हिजिटर्स ला सुद्धा ब्लॉग वाचायला रुची निर्माण होते. दिसायला चांगला असण्यासोबत ब्लॉग पटकन लोड सुद्धा पाहिजे म्हणजे व्हिजिटर्स ला वाट पाहावा नाही लागली पाहिजे. यामुळे ब्लॉगची लोकप्रियता वाढते आणि व्हिजिटर्स पुन्हा-पुन्हा ब्लॉगला भेट देतात.


      On-Page SEO काय आहे? आणि कसे करावे? याबद्दल तुम्हाला आता माहिती मिळाली आहे. जर तुम्हाला अजून काही अडचण असेल तर कंमेंट द्वारे आम्हाला कळवा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!

-FMmarathi.in